नाशिक

२० वर्षे जुन्या सभागृहाच्या नूतनीकरण करा

CD
ॲंकर NSK26H22355 जळगाव : महापालिकेच्या सभागृहाचे नूतनीकरणाची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता योगेश बोरोले, वास्तुविशारद नितीन पारगावकर. महापालिका सभागृहाचे होणार नूतनीकरण होणार महापौर, स्थायी समिती सभापतींच्या मागणीनंतर आयुक्तांकडून पाहणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहाचे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्याचे महापौर दीपमाला काळे यांनी यापूर्वी मागणी केली होती. तसेच पुन्हा स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आयुक्तांकडे सभागृह नूतनीकरणाच्या मागणीचे पत्र दिले आहे. त्यानुसार सायंकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसेच आयुक्त यांनी संयुक्त सभागृहाची पाहणी करून वास्तुविशारद यांना नूतनीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या या सभागृहात विविध प्रशासकीय बैठका, महासभा, स्थायी समितीच्या बैठका, विभागीय आढावा बैठका तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकांचे नियमित आयोजन केले जाते. मात्र, सुमारे ३० वर्षांपासून वापरात असलेल्या या सभागृहाचे नूतनीकरण करणे काळाची गरज बनल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रानुसार महापौर काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. पाटील, आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता योगेश बोरोले तसेच वास्तुविशारद नितीन पारगावकर यांनी सभागृहाची पाहणी केली. या सुविधांची दिल्या सूचना सभागृहात उच्च दर्जाचे इंटिरिअर, ध्वनिक्षेपक व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना, डिजिटल डिस्प्ले प्रणाली, अद्ययावत ऑडिओ-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, एलईडी स्क्रीन, सेंट्रल कंट्रोल सिस्टीम, वातानुकूलन व्यवस्था, आकर्षक फॉल्स सिलिंग तसेच दर्जेदार आसनव्यवस्था आणि फर्निचर उभारण्याचा सूचना वास्तुविशारद यांना दिले आहे. १५० जणांना बैठक व्यवस्था महापालिकेच्या सद्याच्या सभागृहाची सदस्य, अधिकारी व अन्य धरून सुमारे ९० ते १०० जणांची सुविधा होती. परंतु आता नवीन सभागृह रचनेत १०० सदस्य, २० अधिकारी तसेच १५ पत्रकार व सभेत बसण्यासाठी परवानगी घेतलेल्या १५ जण असे एकून १५० जण बसतील अशी अद्ययावत सुविधा करण्यात येणार आहे. चौकट अंदाजपत्रात ३ कोटी निधीची तरतूद महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात सभागृह नूतनीकरणासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिकेत नवीन अद्ययावत असे सभागृह लवकरच तयार केले जाणार असल्याची माहिती स्थायी सभापती डॉ. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

SCROLL FOR NEXT