

Air India AI2379 Pilot Tests Positive for Cannabis
esakal
एअर इंडियाच्या ४ ऑगस्ट रोजीच्या फुकेत-दिल्ली फ्लाईटमधील घटनेबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. मुख्य पायलटने गांजा ओढून विमान चावल्याचे स्पष्ट झाले आहे. एअर इंडियाच्या AI2379 या विमानाचा पायलट-इन-कमांड प्रयोगशाळेतील पुष्टीकरण चाचणीत गांजाच्या सेवनाबाबत 'पॉझिटिव्ह' आढळला आहे. फुकेत-दिल्ली विमान आहे ४ ऑगस्ट रोजी अचानक सुमारे ३०० फूट खाली आले होते. या घटनेत किमान १७ प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले होते.