नाशिक

हास्य क्लबतर्फे योग दिन उत्साहात हास्य क्लबतर्फे योग दिन उत्साहात

CD
पान दोन ------------------- 22322 नाशिक रोड : योग दिनानिमित्त आसने करताना हास्य क्लबचे सदस्य. सिद्धान, प्रथमेश, चिरतरुण, उत्साही हास्य क्लबतर्फे योग दिन उत्साहात सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. २३ : जागतिक स्तरावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गाडेकर मैदान येथे सिद्धान हास्य क्लब व प्रथमेश हास्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच चिरतरुण हास्य क्लब आणि उत्साही हास्य क्लब यांच्या सहकार्याने योग उत्साहपूर्ण वातावरणात झाला. योग, आरोग्य, आनंद आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ योगविशारद ब्रिजमोहन मुंदरा होते. त्यांनी निरोगी, तंदुरुस्त आणि उत्साही जीवन जगणाऱ्या दादाजींनी विविध योगासने, प्राणायाम, श्वसनक्रिया आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उलगडून सांगितले. अध्यक्षा सुशिला टाटिया यांनी योग व हास्ययोगाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी नाशिक हास्य योग समन्वय समितीचे उपाध्यक्ष डी. जी. पाटील, उपाध्यक्ष व विभाग प्रमुख अश्विनी धोपावकर तसेच विभाग प्रमुख चंद्रकांत तेलंगी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले व योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला. डी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत विधाते, नामदेवराव वाघ, चंद्रवदन कुलकर्णी, सिद्धान व प्रथमेश हास्य क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Monsoon Session: अमित शाह घेणार सर्वात मोठा निर्णय... लोकसभेत तीन महत्त्वाचे दिवस! काँग्रेसने जारी केला व्हीप

Sunil Tatkare on Prashant Kishore: नेतृत्वबदलाच्या शिफारसीबद्दल माहिती नाही, मला रणनितीकाराची गरज नाही; प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर तटकरेंची प्रतिक्रिया

Missing Link Safety Risk: बंदी असूनही अवजड वाहने सुसाट; ‘मिसिंग लिंक’मध्ये महामार्ग पोलिस, एमएसआरडीसी प्रशासन करते काय?

यंदा नाहीत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या! जनगणनेच्या कामाचे कारण अन्‌ ग्रामविकास विभागाचे केंद्र शासनाच्या आदेशाकडे बोट, वाचा...

आजचे पंचांग ८ ऑगस्ट २०२६! जाणून घ्या शुभ वेळ, राहुकाळ आणि दिनविशेष

SCROLL FOR NEXT