नाशिक

जागतिक संगीत दिनानिमिमत्त कार्यक्रम

CD
NSK26H22324 नंदुरबार : संगीत दिन कार्यक्रमात बासरीवादन करताना नचिकेत आर्थेकर व कृष्णा मराठे. शेजारी संगीतशिक्षक रश्‍मिकांत त्रिवेदी. --- भारतीय वाद्यसंगीत जगात लोकप्रिय रश्मिकांत त्रिवेदी ः एकलव्य विद्यालयात संगीत दिन उत्साहात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २३ : पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचालित शहरातील एकलव्य विद्यालयात जागतिक संगीत दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी संगीतशिक्षक रश्मिकांत त्रिवेदी यांनी भारतीय संगीताची परंपरा, त्याचे महत्त्व आणि मानवी जीवनातील संगीताचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. ललित कलांमध्ये संगीत ही सर्वोच्च कला मानली जाते. संगीत मानवाला मानसिक, आत्मिक आणि भावनिक आनंद देत असून, सौंदर्याचा अनुभव घडवते, असे सांगितले. भारतीय संगीत आणि भारतीय वाद्यांना जगभरात विशेष मान्यता मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी या वाद्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांसाठी बासरीवादनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थी नचिकेत आर्थेकर व कृष्णा मराठे यांनी बासरी वाजवून वाद्याची ओळख करून दिली. गौरीशंकर धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर, दीपक माळी, विजया न्हायदे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

SCROLL FOR NEXT