नाशिक

निवृत्ती वेतनधारकांसाठी मोबाईल ॲपद्वारे सुविधा उपलब्ध

CD
निवृत्ती वेतनधारकांसाठी मोबाईल ॲपद्वारे सुविधा नंदुरबार, ता. २३ : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयामार्फत निवृत्त वेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली. अ‍ॅपच्या माध्यमातून निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतनाशी संबंधित अनेक सुविधा मोबाईलवरच मिळणार आहेत. अ‍ॅपचा वापर करण्यासाठी निवृत्तिवेतनधारकांकडे पेन्शन वाहिनी पोर्टलवरील लॉगिन, पीपीओ क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि वैध लॉगिन क्रेडेन्शियल्स असणे आवश्यक आहे. अ‍ॅपच्या पहिल्या टप्प्यात मासिक निवृत्तिवेतन देयक इतिहास उत्पन्न प्रमाणपत्र, ई-पीपीओ लायब्ररी, फॉर्म क्रमांक १६, निवृत्तिवेतनविषयक शासन निर्णय, तसेच नवीन घोषणा या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवृत्तिवेतनधारकांना मासिक निवृत्तिवेतनाचा तपशील पाहता येणार आहेत. तसेच उत्पन्न प्रमाणपत्र, फॉर्म क्र. १६ आणि पीपीओ, सीपीओ, जीपीओ यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. अ‍ॅपमध्ये शासनाच्या नवीन सूचना व अद्ययावत माहिती नियमितपणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT