धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 28420
धुळे : गुटखा, अमली पदार्थप्रश्नी मागण्यांवर डॉ. अजय देवरे यांच्याशी चर्चा करताना शिवसेना ‘उबाठा‘चे निवेदनकर्ते.
--
धुळे जिल्ह्यातील रॅकेट उद्ध्वस्त करा
-
गुटखा, अमली पदार्थ विक्रीप्रश्नी शिवसेना ‘उबाठा’चे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : शहरासह जिल्ह्यात गुटखा, सुगंधित तंबाखू, मावा आणि इतर प्रतिबंधित व्यसनजन्य पदार्थांची अवैध तस्करी व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पोलिस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, निंबा मराठे, भरत मोरे, आण्णा फुलपगारे, दिलीप चित्ते, राजू ढवळे, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे, युवा सेनेचे कुणाल कानकाटे, मनोज जाधव, महिला आघाडीच्या अरुणा मोरे, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता वाघ, प्रभादेवी परदेशी, ज्योती वानखेडे, कपिल लिंगायत, महादू गवळी, दिनेश पाटील, मुन्ना पठाण, निलेश कांजरेकर, गोकुळ बडगुजर, जयेश फुलपगारे, इशतियाक अंसारी, तरबेज शेख, वैभव पाटील, अविनाश जोंधळे, राजू पाटील, नितीन पाटील, तालुकाप्रमुख भैया पाटील, मोहनसिंग परदेशी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, या अवैध व्यवसायांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, ‘ओएसएमएफ’सारखे गंभीर आजार जडत आहेत. केवळ तात्पुरत्या किंवा दिखाऊ कारवाया न करता गुटखा तस्करांच्या मुळापर्यंत पोहोचून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याची मागणी आहे. तस्करांनी वर्षभर पुरेल इतका साठा करून ठेवला असल्याचा आरोपही निवेदनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. पक्षीय राजकारणापेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिकेसाठी प्रशासनावर दबाव आणावा. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.