नाशिक

हवेत गोळीबार करणाऱ्या सरपंचाला न्यायलयीन कोठडी

CD
हवेत गोळीबार करणाऱ्या सरपंचाला न्यायलयीन कोठडी सकाळ वृत्तसेवा दहिगाव (ता. यावल), ता. ४ : कोळन्हावी (ता. यावल) येथील सरपंचाने डांभुर्णीतील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी (ता. ३१) त्यांची कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी भुसावळ कारागृहात झाली आहे. कोळन्हावीचे सरपंच विकास ऊर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये देशी दारू विक्री केली जात असल्याचा व्हीडीओ काढल्याच्या रागातून २७ ऑगस्टला रात्री डांभुर्णी (ता. यावल) येथील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व दहशत निर्माण केली होती. त्यांना अटक केली होती. याबाबत हवालदार हितेश बागूल यांच्या फिर्यादीवरून विकास ऊर्फ गोटू सोळुंके व रोशन भिमराव सपकाळे (रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोळुंके तीन दिवस पोलिस कोठडीत होते. त्यांची काेठडी संपल्यावर सोमवारी त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता, त्याला प्रथमवर्ग न्यायधीश आर. एस. जगताप यांनी १४ दिवसांची न्यायलयील कोठडी सुनावली. त्यांची रवानगी भुसावळ उपजिल्हा कारागृहात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२००५ मध्ये पुण्याच्या गणेश विसर्जनात नेमकं काय घडलं? ३३ तास २० मिनिटांची मिरवणूक, दगडफेक अन् जाळपोळ

Gopalkala Recipe: नाश्त्यासाठीही बेस्ट! १० मिनिटांत बनवा श्रीकृष्णाला आवडणारा गोपाळकाला; अशी बनवा झटपट रेसिपी

आजचे राशिभविष्य - 05 सप्टेंबर 2026

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ५ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

SCROLL FOR NEXT