नाशिक

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन डिजिटल निरीक्षरतेचा बसतोय भुर्दंड..!

CD
पान चार मेन ---------------- लोगोः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन डिजिटल निरक्षरतेचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड शहरात ४० तर ग्रामीणमध्ये डिजिटल निरक्षरतेचे प्रमाण सुमारे ५० टक्‍यांपर्यंत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ः पूर्वी सही करता येणे किंवा वृत्तपत्र वाचता येणे म्हणजे साक्षरतेचा निकष मानला जात होता. मात्र, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात केवळ अक्षरांची ओळख असणे पुरेसे राहिलेले नाही. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, इंटरनेट पोहोचले आहे. व्यवहार, शिक्षण सर्व काही आभासी (डिजिटल) जगावर अवलंबून असताना ‘डिजिटल साक्षरता’ काळाची गरज बनली आहे. तरीदेखील शहरी भागात सुमारे ४० टक्‍के, ग्रामीणमध्ये सुमारे ५० टक्‍के लोकसंख्या अद्यापही डिजिटल साक्षर नसल्‍याचा अनेक संस्‍थांचा अहवालातून समोर येत आहे. डिजिटल तंत्रज्ञान वापरताना होणाऱ्या छोट्याशा चुकीमुळे किंवा अज्ञानामुळे आर्थिक नुकसान, मानसिक छळ आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांना गंडा घालण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. विशेषतः सध्या चर्चेत असलेला ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार असो वा रोजच्या व्यवहारातील ‘यूपीआय’ फसवणूक, याला बळी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. लहान मुलांमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली खात्यातील पैसे काढणे, सोशलमीडियावर सायबर बुलिंग (मानसिक छळ), अश्लील मजकूर पाठवणे किंवा अज्ञात लिंक्सद्वारे व्यक्तिगत माहिती चोरणे आदी प्रकार घडत आहेत. युवा वर्गाला वर्क फ्रॉम होम, पार्टटाईम जॉब, इन्स्टंट लोन ॲप्स, क्रिप्टोकरन्सी आणि शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’च्या नावाखाली फसविले गेल्‍याच्‍या घटनांमध्ये वाढ होते आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना बँक केवायसी अपडेट, वीज बिल थकबाकी, पेन्शन व्हेरिफिकेशन किंवा थेट ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमक्या देऊन आयुष्यभराची पुंजी लुटली जाते आहे. --- असे व्‍हा डिजिटल साक्षर... मोबाईलसह इतर गॅझेट हाताळण्याचे शास्‍त्रोक्‍त प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षर होताना सायबर भामट्यांच्या फसव्‍या प्रकारांना बळी न पडता, पोलिस यंत्रणांना कळविणे. बँक अधिकारी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने आलेला ओटीपी, पासवर्ड किंवा एटीएम पिन, युपीआय पिन आदी संवेदनशील व गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा मेसेजवर येणाऱ्या अनोळखी लिंक्स अथवा ‘एपीके’ फाइल्स कधीही डाऊनलोड करू नये. सोशल मीडिया खात्यांवर ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ सुरक्षा पर्याय सुरू ठेवत संभाव्‍य दुर्घटना टाळता येते. --- फसवणूक झाल्यास येथे साधा संपर्क सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर तत्काळ संपर्क साधणे गरजेचे असते. किंवा cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्‍ध आहे. सध्या डिजिटल साक्षरता ही काळाची गरज बनली आहे. जागरूक नागरिकांची कधीही फसवणूक होऊ शकत नाही. याउलट सायबर भामटे आपल्‍या अज्ञानाचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करू शकतात. त्‍यामुळे प्रत्‍येकाने सतर्क राहाणे व डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. - सुशीला कोल्‍हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर सायबर पोलिस ठाणे.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT