नाशिक

ग्रामसमृद्धी नांद्रा : लेख भजनी मंडळ परंपरा

CD
ग्रामसमृद्धी नांद्रा : लेख भजनी मंडळ परंपरा NSK26H27956 : नांद्रा येथील महादेव मंदिरासमोर कीर्तन करताना भजनी मंडळाचे सदस्य. ---- NSK26H27958 : भारूड सादर करताना मंडळाचे कार्यकर्ते. --- NSK26H27959 NSK26H27960 परंपरा जपणारे महादेव भजनी मंडळ. ---- शीर्षक महादेव भजनी मंडळाचा तीन पिढ्यांचा भक्तिवारसा लीड... नांद्रा (ता. पाचोरा) येथील महादेव मंदिर संस्थानच्या महादेव भजनी मंडळाने भजन, गौळण, कीर्तन आणि भारूड या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा वारसा तिसऱ्या पिढीपर्यंत अखंड जपला आहे. या मंडळाच्या भजन-कीर्तनाने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. --- महादेव भजनी मंडळाचा पाया दिवंगत मोहन दुला पाटील यांच्यासह पुंडलिक लोटन सूर्यवंशी, बापू नामदेव बाविस्कर, नथ्थू भदाने, शेखर रुपचंद कुंभार, नथ्थू अन्साराम सूर्यवंशी, दत्तू सोनार, मुरलीधर माधवराव सूर्यवंशी आणि वसंत बळीराम सूर्यवंशी या ज्येष्ठ भजनसेवकांनी घातला. त्यांचा भक्ती, संस्कार आणि सेवाभावाचा वारसा मंडळाचे सदस्य नि:स्वार्थ भावनेने आजही अखंड पुढे नेत आहेत. परंपरेमुळे मंडळाची ओळख टिकली. समाजप्रबोधनाचे कार्य गावागावांत हरिनामाचा गजर करीत तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवून भक्तिमार्गाकडे वळविण्याचे कार्य मंडळ करीत आहे. डीजे आणि आधुनिकतेच्या युगातही पारंपरिक पखवाज, टाळ व मृदंगाच्या साथीने सादर होणाऱ्या भजन-गौळणींना नांद्रा परिसरात आजही पसंती दिली जाते. मंडळ जिल्ह्यात अव्वल पहिल्या पिढीने लावलेल्या भक्तीच्या रोपट्याला दुसऱ्या पिढीने खतपाणी घातले आणि आता तिसरी पिढी नव्या जोशात ही परंपरा पुढे नेत आहे. या मंडळाने जळगाव जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिके मिळविली आहेत. गेल्या वर्षी भडगाव तालुक्यातील आमडदे येथे नानासाहेब प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता, तर यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दत्तजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भजन मालिकेतही पारितोषिक मिळविले आहे. या मंडळाकडे श्रावणातील हरिनाम कीर्तन सप्ताहाचे नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा हातखंडा आहे. ---- मंडळाची कार्यकारिणी अध्यक्ष संजय हिरालाल सूर्यवंशी, सचिव एकनाथ खंडू बाविस्कर असून सदस्यांमध्ये रामदास त्र्यंबक तावडे, सूर्यभान राजाराम पाटील, शिवाजी महारू सूर्यवंशी, पुंडलिक रामा सूर्यवंशी, गंगाधर भिका खैरनार, प्रकाश वसंतराव बोरसे, परमेश्वर पंडित बाविस्कर, बापू भिका खैरनार, तुकाराम रामदास सोनवणे, किशोर रामदास पाटील, सुभाष मधुकर पाटील, निंबा नारायण शिंपी, तुकाराम महादू वाघ, बालू नामदेव तावडे हे सदस्य अभंग, गौळण, कीर्तन, भारुडाद्वारे निःस्वार्थ आध्यात्मिक सेवा देत आहेत. या भजनी मंडळामुळे नांद्रा गावाची एक वेगळी आध्यात्मिक ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT