नाशिक

शिवरे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

CD
POL26B15590 पारोळा ः पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी ग्रामस्थांनी केलेले ठिय्या आंदोलन. --- शिवरे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन --- ग्रामसेवक मृत्यूप्रकरणी आरोपींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा पारोळा, ता. १५ ः शिवरे (ता. पारोळा) येथे १७ ऑगस्टच्या ग्रामसभेत झालेल्या वादंगामुळे ग्रामसेवक पी. एन. पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामसभेला शेकडो लोक उपस्थित असताना, सहा जणांना कशी अटक केली, असे सांगत ते निर्दोष असल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी येथील पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी (ता. १५) सायंकाळी सहाला शिवरेकरांनी ठिय्या आंदोलन केले. शिवरेतील ग्रामसभेला सर्व जण उपस्थित असताना केवळ सहा जणांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असल्याचे सांगत पोलिसांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सरपंच, पोलिस पाटलांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य देखील उपस्थित होते. केवळ राजकारणापोटी निवडक लोकांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहेत. सर्वच्या सर्व निर्दोष असल्याने त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी पोलिस ठाण्याच्या आवारात ग्रामस्थांनी गर्दी करून काही वेळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी लगेचच वाहतूक मोकळी केली. या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता, ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनासंदर्भात त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT