नाशिक

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना अग्निसुरक्षेचे धडे

CD
NSK26H29765 जळगाव : नवीपेठेतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रात्यक्षिकेतून अग्निसुरक्षेचे धडे देताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी. ---- गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना अग्निसुरक्षेचे धडे ‘मनपा अग्निशमन’चा उपक्रम; आगीवर उपाययोजना, यंत्र वापराचे प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : गणेशोत्सवात मंडप परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता संभाव्य आग दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण दिले. आग लागल्यास घाबरून न जाता परिस्थिती हाताळण्यापासून अग्निशामक यंत्राचा योग्य वापर करण्यापर्यंत विविध बाबींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. आयुक्त आदित्य जीवने यांच्या आदेशानुसार आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विजसनी नगर येथील जय गोविंदा मित्र मंडळ तसेच नवीपेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, श्री गर्जना मित्र मंडळ आणि पंचरत्न गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेण्यास मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. आगीची घटना घडल्यास सर्वप्रथम कोणती खबरदारी घ्यावी, परिसरातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे, आगीचा प्रकार लक्षात घेऊन कोणत्या पद्धतीने ती आटोक्यात आणावी, याबाबत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तसेच मंडप उभारणी करताना आवश्यक सुरक्षित अंतर, विद्युत जोडणीतील खबरदारी आणि अग्निशमन साधने सज्ज ठेवण्याचे महत्त्वाच्या गोष्टी यावेळी सांगितल्या जात आहे. गणेशोत्सव काळात गर्दी वाढत असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिकेकडून मंडळांमध्ये जनजागृती सुरू आहे. ‘सुरक्षित गणेशोत्सव, सुरक्षित जळगाव’ या उद्देशाने प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. चौकट दर्शनी भागात यंत्रणा, आपत्कालीन क्रमांक लावा आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाशी तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी विभागाचे दूरध्वनी क्रमांक मंडपाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या. गणेश मंडळांनी स्वयंसेवकांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण देऊन आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत, असे आवाहनही करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT