शहरातील १० प्रमुख मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’
गर्दीवर पोलिसांकडून उपाय; सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारापर्यंत लागू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : गणेशोत्सवाच्या कालावधीत देखावे व आरास पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक शाखेने शुक्रवार (ता. १८) ते गुरुवार (ता.२४) यादरम्यान दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारा या वेळेत बी. डी. भालेकर मैदान, शालीमार, मेन रोड, रविवार कारंजा व अशोकस्तंभ परिसरातील १० प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित केला असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.
हे १० मार्ग राहतील बंद
-अण्णा भाऊ साठे पुतळा (किटकॅट) चौक ते शालीमार चौक : कालिदास कलामंदिर व सुमंगल कपड्याच्या दुकानमार्गे जाणारा रस्ता.
-सीबीएस ते बीडी भालेकर मैदान : गायकवाड क्लास व कान्हेरेवाडी मार्गे दोन्ही बाजूंची वाहतूक.
-खडकाळी सिग्नल ते शालीमार व सीबीएसकडे : दोन्ही बाजूंची वाहतूक बंद.
- दीपसन्स कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा : नेहरू गार्डन मार्गे ये-जा करणारा मार्ग.
-खडकाळी सिग्नल ते गाडगे महाराज पुतळा : त्र्यंबक पोलीस चौकी व पिंपळ चौक मार्गे.
-बादशाही कॉर्नर ते मंगेश मिठाई कॉर्नर : गाडगे महाराज पुतळा व धुमाळ पॉइंट मार्गे.
- मेहेर सिग्नल ते दहीपूल : सांगली बँक सिग्नल व धुमाळ पॉइंट मार्गे.
- प्रतीक लॉज ते नेपाळी कॉर्नरकडे : जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
-अशोकस्तंभ ते मालेगाव स्टँड : रविवार कारंजा मार्गे ये-जा करणारा रस्ता.
-रविवार कारंजा ते शालीमार : सांगली बँक सिग्नल मार्गे येणारी वाहतूक.
--
पर्यायी मार्ग :
- खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - दिंडोरी नाका/रामवाडी मार्गे मखमलाबाद नाका व पेठ नाक्याकडे.
-मुंबई नाका - गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ मार्गे इतरत्र.
- सीबीएस - मोडक सिग्नल - गडकरी सिग्नल - मुंबई नाका मार्गे पुढे.
-मालेगाव स्टँड - मखमलाबाद नाका - रामवाडी - जुना गंगापूर नाका सिग्नल मार्गे पुढे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.