NSK26H29806 (फोटो चार कॉलम घ्यावा, गर्दी आहे)
जळगाव : मू. जे. महाविद्यालयात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसह कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, भालचंद्र पाटील, डी. टी. पाटील, ॲड. प्रमोद पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले आदी.
----
सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त अन् जिद्द यशाची त्रिसूत्री
(उपशीर्षक)
कुलगुरु प्रा. माहेश्वरी : मू. जे. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : मोठी स्वप्ने पाहणे, भविष्यातील ध्येय स्पष्ट ठेवणे आणि त्या ध्येयाच्या दिशेने सकारात्मक विचारांनी वाटचाल करणे आवश्यक आहे. परिस्थिती कोणतीही असो, आपल्या विचारांची दिशा आणि दृष्टिकोन आपल्या प्रगतीवर परिणाम करतात. यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करा, असे आवाहन कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ कान्ह ललित कला केंद्र संचलित महाकवी कालिदास सभागृहात झाला. या समारंभात कुलगुरु प्रा. माहेश्वरी बोलत होते. कार्यक्रमात केसीईच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भालचंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी केसीईचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. अशोक राणे, स्वीकृत सदस्य अनिल राव आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते समारंभानिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला प्रभारी प्राचार्य प्रा. केतन नारखेडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
इन्फो
४७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी २०२०-२१ ते २०२४-२५ मधील एकूण ४७ सुवर्णपदके आणि १९९ गुणवत्ता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. पदवी व सुवर्णपदक घेताना आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.