फोटो : NSK26H29822
नंदुरबार : विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करताना खासदार गोवाल पाडवी, आमदार किशोर दराडे, पृथ्वीराज रघुवंशी, राम रघुवंशी, शिरीष चौधरी, डॉ. रवींद्र चौधरी आदी.
-----------------------
हिरा प्रेरणा महोत्सवात
७५ दात्यांचे रक्तदान
नंदुरबार, ता. १७ : स्व. हिरालाल चौधरी यांच्या जयंती महोत्सवानिमित्त हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे अभिवादन सोहळा, पारितोषिक वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्मृतीस्थळी पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री. गजानन मंदिर सभागृहात विविध कार्यक्रम घेण्यात आले. रक्तदान शिबिरात ७५ दात्यांनी रक्तदान केले.
उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत वाणी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी खासदार गोवाल पाडवी होते. शिक्षक आमदार किशोर दराडे, माजीमंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, मर्चंट बँकेचे चेअरमन किशोरभाई वाणी, उद्योगपती पृथ्वीराज रघुवंशी, मदनलाल जैन, तळोद्याच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा चौधरी, तळोदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, नंदुरबार नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी क्रांती अडसूळ, हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संस्थापिका इंदुबाई चौधरी, अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी, उपाध्यक्षा अनिता चौधरी, संचालिका वंदना चौधरी, हिरा उद्योग समूहाचे उद्योजक आशिष चौधरी, प्रणव चौधरी, यश चौधरी आदी उपस्थित होते.
राम रघुवंशी, शिरीष चौधरी, किशोरभाई वाणी, रवींद्र चौधरी, किशोर दराडे, गोवाल पाडवी यांनी यांनी स्व. हिरालाल चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. निबंध, वक्तृत्व व व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. युवराज भामरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.