धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
कार्यालय आवारातून
दोन ट्रॅक्टर चोरीला
धुळे : शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात महसूल विभागाने जप्त करून आणलेले दोन ट्रॅक्टर, त्यांच्या ट्रॉली व त्यातील वाळूसह अज्ञात व्यक्तीने नेल्याची घटना १४ ते १५ सप्टेंबरदरम्यान घडली. यात एक लाख सहा हजार किमतीचा ट्रॅक्टर (एमएच १८ झेड २८४२), विना क्रमांकाची ट्रॉली व त्यातील एक ब्रास वाळू, तसेच तीन लाख सहा हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी ४५०९), विनाक्रमांकाची ट्रॉली व त्यातील एक ब्रास वाळू, असा एकूण चार लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबत ग्राम महसूल कर्मचारी सूरज भदाणे यांच्या फिर्यादीनुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
केबलचोरीचा उलगडा;
दोघे संशयित ताब्यात
धुळे : मालपूर (ता. साक्री) परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत मोटारींच्या केबल चोरीप्रकरणी दोन संशयितांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालपूर तसेच कासारे शिवारातील विविध शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या प्रकरणी माजी सरपंच शशिकांत भामरे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीस गेलेल्या केबल तसेच या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू असून गुन्हा दाखल झाला.
-
कार लांबविली;
चौघांविरुद्ध गुन्हा
धुळे : निमगूळ (ता. शिंदखेडा) शिवारातून तीन लाखांची कार (एमपी ०९ टीए ७०८९) चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चार सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. याबाबत कारचालक सिद्धार्थ नंदलाल पाल (रा. भागीरथपुरा, जि. इंदूर, मध्य प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.