फोटो : NSK26H29924
नंदुरबार : चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत सुरेश पाटील, शशिकांत पाटील, प्रा. नयना पवार आदी.
---------------
चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १९ : पर्यावरण संरक्षण आणि ओझोनचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी के. डी. गावित शैक्षणिक संकुल कोरीट येथे जागतिक ओझोन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी ओझोन थराचे महत्त्व, हानिकारक अतिनील किरणांपासून ओझोनमुळे होणारे संरक्षण आणि ओझोन थराच्या संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. नयना पवार यांनी विद्यार्थ्यांना ओझोन दिनाचे महत्त्व व पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती दिली. सुनीता निकम, मीनाक्षी पाटील, किशोर भिलावे, प्रा. प्रशांत बोरसे, नीता साळुंखे आणि रवींद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ओझोन दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी निसर्ग, पृथ्वी, पर्यावरण आणि ओझोन थराशी संबंधित विविध चित्रे साकारली. ‘ओझोन थर वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा’ असा संदेश यातून दिला. कार्यक्रमास प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, राकेश पाटील, व्ही. एस. पाटील, सुनीता निकम, विश्वासराव शिरसाठ, रवींद्र सोनवणे, चारुशीला निकम, मिनाक्षी पाटील, ज्योत्स्ना देवरे, जयश्री देवरे, नीता साळुंखे, प्रा. भरत चव्हाण, प्रा. नयना पवार, प्रा. सुनील खाडे, प्रा. स्वाती बारी, प्रा. प्रशांत बोरसे, सुनंदा पाटील, कौशिक बाविस्कर आणि किशोर भिलावे आदी उपस्थित होते. प्रा. स्वाती बारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील खाडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.