नाशिक

शिक्षक समन्वय समिती

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 30030 धुळे : गणवेश अनुदानासह विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांना देताना जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी. -- गणवेश अनुदानासह वेतनश्रेणीचा लाभ मिळावा -- शिक्षक समन्वय समितीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन; विविध विषयांवर चर्चा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : विद्यार्थ्यांचे उर्वरित गणवेश अनुदान व दुसऱ्या गणवेशाचे अनुदान लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागणीसह प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांची भेट घेण्यात आली. या वेळी शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले. - बैठकीस उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनार, उपशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ नगराळे उपस्थित होते. चर्चेदरम्यान गणवेश अनुदानासह शिक्षकांच्या इतर महत्त्वाच्या विषयांवरही विचारविनिमय करण्यात आला. यात प्रामुख्याने निवेदनात नमूद केल्यानुसार, बारा वर्षांची वरिष्ठ वेतनश्रेणी व चोवीस वर्षांची निवड वेतनश्रेणी प्राप्त प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत. जळगाव व नाशिक जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील जुलै २०२६ पर्यंत चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड वेतनश्रेणीचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवावे अशी भूमिका मांडण्यात आली. सर्व शिक्षकांना गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत उपलब्ध करून देणे, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करणे आणि २०२५-२६ ची जीपीएफ स्लिप उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवरही भर देण्यात आला. तसेच, पदवीधर विषय शिक्षकांना २०१६ पासूनची वेतननोती लागू करण्याबाबत कार्यवाही करणे, युनियन बँक शाखाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून एनपीएस वर्गणी नियमित जमा करणे, ई- ऑफिस प्रणालीतील प्रलंबित फाईल्स तातडीने निकाली काढणे या मागण्याही करण्यात आल्या. शिक्षकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत विशेष तक्रार निवारण सभा घेण्याची मागणी करण्यात आली. - मानधन अदा करा या चर्चेत शालेय पोषण आहारातील स्वयंपाकी व मदतनीस यांचे एप्रिल २०२६ पासून प्रलंबित मानधन अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातही शालेय पोषण आहारासाठी एफएसएसएआय परवाना स्वयंपाकी व मदतनीस यांच्या नावाने काढण्याबाबत कार्यवाही करावी, असा मुद्दा मांडण्यात आला. शिक्षकांच्या या सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा होऊन संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे शिक्षक समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, संजय पोतदार, बापू पारधी, भूपेश वाघ, विश्वनाथ सोमवंशी, नवीनचंद्र भदाणे, जगदीश बडगुजर, शरद पाटील, हेमकांत अहिरराव, शरद पवार, अविनाश काकुळदे, इम्तियाज अन्सारी, रियाज अन्सारी, ज्ञानेश्वर बाविस्कर, शमसूद हसन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

करपलेलं सोयाबीन... चाऱ्यासाठी काढणी! शेतात महिलांची धडपड!

SCROLL FOR NEXT