नाशिक

पोलिस ठाण्यात वृक्षारोपण

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 30118 धुळे : शहर पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपण वेळी उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मी धुळेकर संघटनेचे पदाधिकारी. -- ‘मी धुळेकर’तर्फे पोलिस ठाण्यात वृक्षारोपण -- ‘मिशन ग्रीन धुळे’ उपक्रमात वृक्षांची लागवड सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : शहरात दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. शहराचे तापमान कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मिशन ग्रीन धुळे’ अंतर्गत ‘मी धुळेकर’ संघटनेतर्फे शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत धुळे शहर पोलिस ठाणे परिसरात लिंब, गुलमोहर, पिंपळ अशा विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोंगडे, उपनिरीक्षक रेखा सोनवणे, उपनिरीक्षक वैशाली खांडेकर आणि ‘मी धुळेकर’चे निरंजन भतवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संतुलनाशिवाय जगणे मुश्कील आहे, म्हणून सर्वांनी वृक्ष लागवडीच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंगडे यांनी केले. पोलिस हवालदार विजय जाधव, संदीप ठाकरे, संजय सूर्यवंशी तसेच ''मी धुळेकर''चे संजय सैंदाणे, दिनेश वाघ, छोटू पोतदार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख उपस्थित होते.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT