नाशिक

तेली समाज मंडळातर्फे चारशे गुणवंतांचा गौरव

CD
बातमी आजच घ्यावी ------ NSK26H30142 जळगाव : जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवारी झालेल्या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवर. ----- तेली समाज मंडळातर्फे चारशे गुणवंतांचा गौरव ----- मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : येथील जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दहावी, १२वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षांत उत्तीर्ण ३७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (ता.२०) पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव नारायण चौधरी, महासभा जिल्हाध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी, राजेंद्र चौधरी, संतोष चौधरी, वामन चौधरी आदी मान्यवर मंचावर होते. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ऑफिस फोल्डर बॅग, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जुन्या चालीरीतींना मूठमाती देत आईच्या पार्थिवाला खांदा व मुखाग्नी देऊन उत्तरकार्य विधी पार पाडून सामाजिक धाडस दाखविल्याबद्दल भामरे येथील पूनम विजय चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून कावेरी चौधरी (अमळनेर), भुवनेश्वरी चौधरी व अमृता चौधरी (जळगाव) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव नारायण चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन लोटन चौधरी व सतीश चौधरी यांनी केले. दुर्गेश चौधरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT