नाशिक

गणेशोत्सवात महावितरणकडून ऊर्जा साक्षरतेचा जागर

CD
NSK26H30198 जळगाव : महावितरणतर्फे विद्यालयात विद्यार्थ्यांचे ऊर्जा प्रबोधन करताना महावितरणचे अधिकारी. --- ‘महावितरण’कडून ऊर्जा साक्षरतेचा जागर गणेशोत्सवात अभियंत्यांकडून शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘ऊर्जा प्रबोधन मोहीम’ राबविण्यात येत आहे. हरित ऊर्जेचा वापर, वीज बचत आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी महावितरणचे अभियंते शाळा, महाविद्यालये तसेच गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधत आहेत. ‘हरित ऊर्जा आणि विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल’ हा संदेश घेऊन सुरू असलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील वीज बचतीच्या उपायांची माहिती दिली जात आहे. गरज नसताना दिवे-पंखे बंद ठेवणे, एलईडी दिव्यांचा वापर करणे तसेच अधिक ऊर्जा कार्यक्षम उपकरणांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सौर व पवन ऊर्जेच्या वापराचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, ‘स्मार्ट’ छतावरील सौर योजना, ई-वाहन धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि ‘गो ग्रीन’ यांसारख्या योजनांची माहितीही देण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, अभियंते व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT