नाशिक

रामतीर्थात पुन्हा खळाळली ‘अरुणा’ची धार?

CD
30247 नाशिक : रामतीर्थात जमीनीखालून सुरू असलेली पाण्याची धार. रामतीर्थात पुन्हा खळाळली ‘अरुणा’ची धार? पाण्याचा स्रोत शोधण्यासाठी वैज्ञानिक तपासणीची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : सोमवारी (ता.२१) काही काळ झालेल्या मुसळधार पावसानंतर रामतीर्थ परिसरातील अरुणा-गोदावरी संगमस्थळी अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याची धार वाहताना दिसल्याने या पाण्याचा नेमका स्रोत काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे पाणी केवळ पावसाचे आहे, भूजलाचा झरा आहे, गटारीचा प्रवाह आहे की ऐतिहासिक अरुणा नदीच्या नैसर्गिक जलमार्गाशी त्याचा संबंध आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. रामतीर्थ हा केवळ धार्मिक स्नानाचा घाट नसून गोदावरीच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवाहाचे केंद्र मानले जाते. गोपिकाबाई पेशव्यांनी रामतीर्थाची दुरुस्ती केली होती. याच परिसरातील अस्थिविलय तीर्थामुळे रामतीर्थाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकच्या धार्मिक परंपरेत गोदावरीचा प्रवाह आणि तिच्याशी जोडलेल्या उपनद्या-तीर्थांना स्वतंत्र महत्त्व आहे. स्थानिक संदर्भांनुसार रामशेज परिसरातून येणारी अरुणा नदी पंचवटीतील इंद्रकुंडमार्गे रामतीर्थाच्या गोमुखातून गोदावरीला मिळत असल्याचे उल्लेख आढळतात. त्यामुळे रामकुंड परिसरातील अरुणा-गोदावरी संगमाला केवळ भौगोलिक नव्हे, तर तीर्थपरंपरेतही स्थान आहे. मात्र, गेल्या काही दशकांत या नैसर्गिक जलप्रवाहावर बांधकामे, काँक्रिटीकरण आणि पाइपलाइनच्या माध्यमातून बदल झाले आहेत. त्यामुळे पाण्याची धार नक्की कोठून येते हे तपासणे क्रमप्राप्त आहे. याबाबत गोदाप्रेमी देवांग जानी यांनी महापालिकेला पत्र लिहीत चौकशीची मागणी केली आहे. --- सोमवारच्या पावसानंतरचा प्रवाह महत्त्वाचा ठरला आहे. एखाद्या बंदिस्त किंवा काँक्रिटच्या परिसरातून पाणी अचानक विशिष्ट दिशेने बाहेर पडत असेल, तर त्या प्रवाहामागे भूजलाचा दबाव, जुन्या नैसर्गिक नाल्याचा मार्ग, पावसाचे पाणी किंवा इतर जलवाहिन्यांचा संबंध असू शकतो. मात्र केवळ दृश्य निरीक्षणावरून तो अरुणा नदीचा प्रवाह असल्याचे निश्चित करता येणार नाही. त्यासाठी जलवैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे. -मकरंद वालझाडे, जल अभ्यासक --- या प्रवाहाचा संबंध अरुणा नदीच्या नैसर्गिक जलमार्गाशी असल्याचे सिद्ध झाले, तर अरुणा पुनर्जीवनासाठी तो अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास आता पुढे ढकलता कामा नये. प्रशासनाने जुन्या नकाशे-जलमार्गांचा अभ्यास करावा आणि अरुणा-गोदावरी संगमाचा स्वतंत्र जलवैज्ञानिक अहवाल तयार करावा. - देवांग जानी, गोदाप्रेमी --- कुंभमेळ्यात रामतीर्थाला केंद्रस्थानी महत्त्व आहे. नाशिकच्या कुंभपरंपरेत गोदावरीच्या काठावरील रामतीर्थ हे प्रमुख धार्मिक स्थळ असून लाखो भाविकांच्या स्नानाशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे रामतीर्थातील प्रत्येक नैसर्गिक जलप्रवाहाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. निकेत ठाकूर, भाविक ---

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT