नाशिक

शिव गणेश मित्र मंडळातर्फे २० फूट उंच बाप्पांची भव्य स्थापना

CD
NSK26H30305 जळगाव : शिव गणेश मित्रमंडळातर्फे बसविण्यात आलेले वीस फूट उंचीची आकर्षक मूर्ती. --- शिव गणेश मंडळाच्या २० फुटी मूर्तीचे आकर्षण भक्ती, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांची अनोखी सांगड; बालगोपालांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२२ : पिंप्राळा येथील विद्यानगर परिसरातील ‘विद्यानगराचा विघ्नहर्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिव गणेश मित्रमंडळाने गणेशोत्सवाच्या नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा मंडळातर्फे तब्बल २० फूट उंचीच्या आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची सांगड घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडळातील बालगोपाल कार्यकर्ते उत्सवाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेत असून, त्यांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदाची भव्य गणेशमूर्ती मूर्तिकार चंद्रकांत वर्णे यांनी कलात्मक पद्धतीने साकारली आहे. त्यांच्या कलेचा गौरव म्हणून मंडळाच्या वतीने त्यांना आरतीचा मान देऊन सन्मान करण्यात आला. अनोखा उपक्रम मंडळातील बालगोपालांच्या पुढाकारातून ‘श्रीगणेश प्रत्येकाच्या घरी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दररोज सकाळ-सायंकाळ आरतीचा मान मिळणाऱ्या सुमारे पाच ते सहा जोडप्यांना मूर्तीची आकर्षक प्रतिकृती असलेली फ्रेम भेट म्हणून देण्यात येत आहे. दररोज सुमारे १० ते १२ कुटुंबांपर्यंत गणरायाची ही आठवण पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेड प्लस ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबिरात मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. चौकट भक्तिमय संगीत कार्यक्रम मंडळातर्फे रविवारी (ता. २०) भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशांत कोठावदे, भूषण अमृतकर आणि उद्धव कोठावदे यांनी कोणतेही मानधन न घेता स्वेच्छेने संगीत सादर केले. गणेशभक्तिगीते, कानबाईची गाणी आणि विविध भक्तिमय गीतांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT