नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- कुटुंबीयांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा धुळे : कावठी (ता. धुळे) येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून घरात प्रवेश करत चौघांनी कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी समाधान शिंदे याने सुनील रामकृष्ण पाटील यांच्या डाव्या डोळ्याजवळ काठीने प्रहार केला. त्यात पाटील जखमी झाले. सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार १७ सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय नथ्था शिंदे, गिरीष संजय शिंदे, समाधान संजय शिंदे व सुरेखा संजय शिंदे हे त्यांच्या घरी आले. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी वाद घातला. पाटील यांच्या पत्नी व आईला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाद वाढल्यानंतर चौघांनी पाटील यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी समाधान शिंदे याने काठीने त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ प्रहार केला. या हल्ल्यात पाटील जखमी झाले. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध गुन्हा दाखल झाला. - दुकान फोडले; मुद्देमाल लंपास धुळे : घोडदे (ता. साक्री) येथील हार्डवेअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. यात वजन काटा, तीन पाण्याच्या मोटारी, विविध प्रकारच्या तारा, रसवंती मशीन, स्प्रे पंप, रॉड पेट्या, खिडक्या तसेच शेती व बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरीस गेले. भूषण सुरेश शिरसाट यांचे घोडदे येथे हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे १५० किलो तार, ८० किलो सेंट्रिंग तार, तीन पाण्याच्या मोटारी, रसवंती मशीन, स्प्रे पंप मशीन, १८ रॉड पेट्या, २०० खिडक्या, बॉल व्हॉल्व्ह, निपल, टॅप, टिक्कम, कोयता, चुका, फावडा, सुतळी, दोर बंडल व रेन पाईप आदी साहित्य चोरीस गेले. ही घटना लक्षात आल्यानंतर शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - औद्योगिक वसाहतीत ६०० फूट वायर लंपास धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक टी- ११८ येथील आयपी प्राईम फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या परिसरातून ६०० फूट कॉपर वायर व सुमारे २० लोखंडी अँगल चोरीस गेले. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - दुचाकींची धडक; एकाचा मृत्यू धुळे : पिंपळगाव खुर्द (ता. साक्री) येथील फरशीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रदीप सुधाकर सावंत (वय ४४, रा. डांगशिरवाडे, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. प्रदीप सावंत हे दुचाकीने (एमएच १८ सीएफ ७८४०) जात असताना समोरून आलेल्या (एमएच १८ बीके ४४७६) क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. याप्रकरणी विवेक सुधाकर सावंत (रा. डांगशिरवाडे) यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT