नाशिक

उपक्रमात मान्यवरांची व्याख्याने

CD
‘लेखक तुमच्या भेटीला’ २७ सप्टेंबरपासून उपक्रमात मान्यवरांची व्याख्याने सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : ज्योती स्टोअर्सतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे यंदा २७ वे वर्ष असून, सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या व्याख्यान, मुलाखती आणि संवादांचे आयोजन करण्यात आले आहे. शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूर रोड येथे सायंकाळी साडेसहाला हे कार्यक्रम होणार आहे. उपक्रमाचे पहिले पुष्प रविवारी (ता.२७) ज्येष्ठ लेखक व प्रसिद्ध व्याख्याते मनोज अंबिके यांच्या व्याख्यानाने गुंफले जाणार आहे. ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ या विषयातून मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्याबाबत ते मार्गदर्शन करतील. बुधवारी (ता.३०) महाराष्ट्रातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व व्याख्याते चंद्रशेखर टिळक यांची त्यांच्या साहित्यावर आधारित मुलाखत सोमनाथ राठी घेणार आहेत. ३ ऑक्टोबरला ज्येष्ठ लेखक प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या ‘अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी कंबोडियावरील माहितीपट व स्लाइड शो सादर केला जाणार असून, प्रा. विनायक गोविलकर, बी. जी. वाघ, प्रा. दिलीप फडके, डॉ. डी. एम. गुजराथी आणि डॉ. आशिष कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. ४ ऑक्टोबरला विवेक मेहेत्रे ‘दीर्घायुषी व्यक्तींची रहस्ये’ अर्थात ‘चला आनंदाने जगू या’ या विषयावर स्लाइड शोसह मार्गदर्शन करतील. १० ऑक्टोबरला ज्येष्ठ नाट्य व सिनेकलावंत तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या अभिनय प्रवासावर संवाद होणार असून, डॉ. स्मिता मालपुरे त्यांच्याशी हितगुज करणार आहेत. या कार्यक्रमाला कलावंत अशोक देवरे तसेच ज्येष्ठ उद्योजक व कॅम्लिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर उपस्थित राहणार आहेत. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे (गझलनवाज) ‘माझा गझल प्रवास’ या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. मालिकेतील अखेरचे पुष्प १७ ऑक्टोबरला पॅलिएटिव्ह केअर (परिहार सेवा) तज्ज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांच्या ‘सोबत सांजवेळची’ या कार्यक्रमाने गुंफले जाणार आहे. कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य असून उपक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT