ॲंकर
NSK26H30381
लोगो : जिल्हा बँक निवडणूक
-----
गिरीश महाजन, रक्षा खडसे, देवकरांसह अनेकांचे ठराव
प्रारूप मतदार यादीत विद्यमान अध्यक्ष संजय पवारांसह सहा आमदार इच्छूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, त्यांची पत्नी नगराध्यक्षा साधना महाजन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील, बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, त्यांच्या पत्नी सोनल पवार, यासह सहा आमदार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या नावाचे ठराव झाले आहेत.
निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी विभागीय सहनिबंधकांकडून सोमवारी (ता. २१) जाहीर करण्यात आली. १४ ऑक्टोबरला मतदार यादी अंतिम होणार आहे. जिल्हा सहकारी बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील नावांबाबत किंवा ठरावांबाबत मोठी उत्सुकता लागून होती. प्रारूप यादीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे कर्की, कोथळी, घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) या तीन संस्थांमधून ठराव असल्याचे यादीत नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा सालबर्डी येथून ठराव झाला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हिवरखेडा (ता.जामनेर) येथून, तर त्यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांचा सुनसगाव येथील संस्थेतून ठराव आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचा हिंगोणे, हिरापूर (ता.चाळीसगाव) येथून ठराव आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा अंतुर्ली (ता.पाचोरा) येथून, तर त्यांचे पुत्र सुमित पाटील यांचा अंतुर्ली-लोहारा येथून ठराव आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)चे नेते आमदार अनिल पाटील यांचा अमळगाव (ता.अमळनेर) येथून तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा सोनखेडी येथून ठराव आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा जळगाव शहरातील मेहरुण नागरी पतसंस्थेतून, तर आमदार अमोल पाटील यांचा देवगाव (ता. पारोळा) येथून ठराव झाला आहे. आमदार पाटील यांच्या मातोश्री नलिनी पाटील यांचाही गृहनिर्माण संस्थेतून ठराव असल्याचे यादीत आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा पाथरी (ता. जळगाव), पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचा पाळधी (ता. धरणगाव) येथून ठराव आहे. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा चोरगाव, उखळवाडी (ता.धरणगाव) येथून ठराव झाला आहे. त्यांच्या पत्नी सोनल पवार यांचा चांदसर आणि गारखेडा येथून ठराव आहे. महापालिकेच्या नगरसेविका वैशाली पाटील यांचा चांदसर, प्रदीप देशमुख यांचा चाळीसगाव आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा पिंप्राळा येथून ठराव असल्याचे यादीत आहे. माजी महापौर जयश्री महाजन व सुनील महाजन यांचेही मेहरुण येथून ठराव आहेत.
चौकट
हरकती, सुनावणीकडे लक्ष
प्रारूप मतदार यादीमुळे विविध संस्थांच्या प्रतिनिधित्वाचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत दाखल होणाऱ्या हरकती आणि ९ ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर काही नावांमध्ये किंवा ठरावांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.