नाशिक

‘जिल्हा नियोजन’च्या बैठकीला मुहूर्त लागेना

CD
पालकमंत्री मिळाले; नियोजन बैठकीला मुहूर्त कधी? बैठकीअभावी ९६५ कोटींच्या निधीच्या नियोजनाला विलंब सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२२ : तब्बल दीड वर्षानंतर नाशिकला पालकमंत्री लाभले असले तरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवून महिनाभराचा कालावधी उलटला, तरी जिल्हा वार्षिक योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे ९६५ कोटी रुपयांच्या नियतव्ययाच्या निधीच्या नियोजनाला विलंब होत असून, जिल्ह्याच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील मतभेदांमुळे नाशिकला दीड वर्ष पालकमंत्री नव्हते. अखेर गेल्या महिन्यात महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकत्व सोपविण्यात आले. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा टप्पा सुरू झाला तरी बैठक झालेली नाही. यंदा जिल्ह्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून ९६५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकच झालेली नसल्याने निधीच्या वाटपाचे नियोजन रखडले आहे. आता ही बैठक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीच्या नियोजनास आणखी विलंब होणार असून, विकासकामांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT