नाशिक

संशयास्पद खवा जप्त

CD
धुळे : टुडे पान १ साठी...सेकंडमेन -- फोटो क्रमांक : 30340 धुळे : महामार्गावर जप्त करण्यात आलेली माव्याची वाहतूक करणारी बस. शेजारी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस पथकातील अधिकारी, कर्मचारी. -- धुळ्यात १६ लाखांचा खवा जप्त -- संशयास्पद : ‘एफडीए’सह पोलिस पथकाची कारवाई सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (ता. २२) मोठी कारवाई केली. अहमदाबादहून अकोलाकडील दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसमधून तब्बल १६ लाख ५२ हजार १०० रुपये मूल्याचा पाच हजार ३८५ किलो संशयास्पद मावा (खवा) अन्न व औषध प्रशासन आणि तालुका पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत जप्त केला. - पथकास मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सहाच्या सुमारास अहमदाबादहून अकोला येथे जाणारी अशोक लेलँड कंपनीची वेलकम लक्झरी बस (एमपी ४४ झेडएफ ७२१४) या वाहनातून मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खव्याची वाहतूक होणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग सहावरील मोराणे हद्दीत साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ वाहन थांबवून तपासणी केली. यात विविध कंपन्यांचा खवा आढळून आला. पुढील कारवाईसाठी हे वाहन टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे आणण्यात आले. वाहनचालक जगदीश मानजी पाटीदार, महेंद्रसिंग परबतसिंग राठोड आणि क्लिनर राजकुमार रोशनलाल आचार्य (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) हे लक्झरी बस मध्ये होते. - १३ नमुने ताब्यात वाहनात प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदी), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझर्ट (नंदि) आणि प्रीमियम डेझर्ट (मीरा) या १३ विविध अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. भेसळीच्या संशयावरून पाच हजार ३८५ किलो वजनाचा आणि १६ लाख ५२ हजार १०० रुपये किमतीचा साठा जप्त करून कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त मंगेश माने (नाशिक), सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खाकीदा सय्यद, सतीश कोठावदे, पंकज पाटील यांच्या पथकाने केली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT