धुळे ः टुडे १ साठी...ॲंकरच्या शेजारी............टुडे १ चे कामकाज संपले.........
--
बस अडवून चालकाला
चाकूचा दाखविला धाक
-
रेसिडेन्सी पार्कजवळ सकाळी घटना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ दुचाकी बससमोर आडवी लावून महामंडळाची नाशिक- जळगाव बस अडविण्यात आली. हातातील चाकू दाखवत चालकाला धमकावून खंडणीची मागणी केल्याचा प्रकार सोमवारी (ता. २१) सकाळी नऊच्या सुमारास घडला.
नशेत असलेल्या तरुणाने चालक, वाहक व प्रवाशांना चाकूचा धाक दाखविल्याने बसमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. नाशिक- जळगाव बस (एमएच १४ एमएच २९७५) धुळ्याकडे येत असताना हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ तरुणाने दुचाकी बससमोर आडवी लावली. चाकू दाखवत त्याने चालकाला बस थांबविण्याचा इशारा केला. बस थांबताच तो आत चढला आणि चालकाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केली. वाहकालाही शिवीगाळ करून प्रवाशांना चाकूचा धाक दाखविला. त्याने फोन करून परिचित महिला व इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचे चालकाने सांगितले. काही प्रवाशांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले व त्याच्याकडील चाकू जप्त केला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चालकाने वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. संबंधित तरुणाने अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही चालकाने पोलिसांना सांगितले. प्रवाशांना इच्छितस्थळी रवाना केल्यानंतर चालक व वाहकाने बस शहर पोलिस ठाण्यात आणली. याप्रकरणी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.