नाशिक

भुसावळ ते ठाणे एनसीबी कनेक्शन

CD
भुसावळ ते ठाणे एनसीबी कनेक्शन ----- संशयिताला पहाटे ताब्यात घेत दिवसभर पोलिसांत कसून चौकशी सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २२ : खडका रोडवरील मोहंमद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने मंगळवारी (ता. २२) पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयिताची दिवसभर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला ठाणे येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. नशेच्या गोळ्यांच्या प्रकरणातून तपासाला वेग ठाणे परिसरातील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान ‘सिद्धीक’ नावाच्या संशयिताकडून नशायुक्त ‘बटण’ नावाच्या गोळ्यांच्या दहा स्ट्रिप जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित संशयिताची चौकशी करताना त्याने भुसावळातील एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ याच्याशी वैयक्तिक संबंध असल्याचे तपास पथकाला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. या माहितीच्या आधारे ठाणे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ गाठून एजाज खान याला मंगळवारी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दिवसभर चौकशी ताब्यात घेतल्यानंतर एजाज खानला भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सकाळपासून रात्री साडेआठपर्यंत एनसीबीच्या पथकाने त्याची चौकशी केल्याचे सांगण्यात आले. ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित विविध बाबींवर त्याच्याकडून माहिती घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनसीबीचे पथक संशयिताला घेऊन ठाणे-मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठे रॅकेट उघडकीस येणार? नशायुक्त गोळ्यांच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान भुसावळातील व्यक्तीचे नाव समोर आल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. एजाज खान याच्याकडून चौकशीदरम्यान कोणती माहिती मिळाली, तसेच त्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या तपासातून नशायुक्त औषधे अथवा गोळ्यांच्या पुरवठ्याशी संबंधित मोठे रॅकेट उघडकीस येते का, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या या प्रकरणातील आरोप व संशयाबाबत अधिकृत तपशील एनसीबीकडून जाहीर करण्यात आलेला नसल्याने पुढील तपासानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

White Stork in Ratnagiri : महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला 'युरोपियन पांढरा करकोचा' रत्नागिरीत अवतरला; जाणून घ्या या परदेशी पाहुण्याचा थक्क करणारा प्रवास

कधी राम तर कधी परशुराम! रणबीर कपूरचा अनोखा अवतार पाहून चाहते थक्क; BTS VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : 'पंतप्रधानांकडून दिवाळीनिमित्त ८,००० रुपयांची मदत' देणारे संदेश बनावट; बँकिंग माहिती चोरण्याचा प्रयत्न: गुजरात पोलीस

IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

SCROLL FOR NEXT