धुळे : टुडे पान २ साठी.. मेन
--
जिल्ह्यातील सेतू केंद्र दोन दिवसांपासून बंद
--
मेंटनन्सचा फटका; जिल्ह्यातील एक हजार १३३ केंद्रातील कामे रखडली
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : तांत्रिक काम निघाल्यामुळे जिल्ह्यातील सेतूसेवा केंद्र शुक्रवारी (ता. १६) दुपारी चारपासून ठप्प पडले आहेत. चार दिवस सेतू केंद्र बंद राहणार असून थेट बुधवारी (ता. २१) सेतू केंद्र सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करण्याची वेळ येणार आहे.
-
जिल्ह्यात एक हजार १३३ होऊन अधिक सेतू केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यात सरकारी तसेच खासगी सेतू केंद्राचा समावेश आहे. या सेतू केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी, डोमिसाईल, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलिअर, ज्येष्ठ नागरिक, तसेच ईडब्ल्यूएस दाखला देण्यात येते. त्याचप्रमाणे महसूल विभागाची कामे, ओळखपत्र, जन्म मृत्यू नोंदणी, शॉपॲक्ट यासह इतरही कागदपत्रे काढून देण्यात येते. सर्वसामान्यांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने सेतू केंद्र नियमित सुरू राहते. मात्र, तांत्रिक कामाचा दाखला देत शुक्रवारी दुपारी चार वाजतापासून सेतू केंद्राची ''सिस्टम'' ठप्प पडली होती. त्यामुळे अनेकांची कामे रखडली. दरम्यान, ‘सिस्टम’मधील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने चार दिवस सेतू केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय शासनस्तरवरून घेण्यात आला आहे. याबाबत सेतू केंद्रचालकांना अवगत करण्यात आले आहे. आता सलग दोन दिवस शासकीय सुट्टी आहे. नंतर सोमवारी एक दिवस कार्यालय असून पुन्हा दसऱ्याची सुट्टी आहे. त्यामुळे सेतू केंद्रामध्ये कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहते. परंतु, या कालावधीत अतिआवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्यांची चांगलीच गोची निर्माण होण्याची शक्यता आहे.
-
अनेकदा सिस्टम राहते ‘स्लो’
कुठल्याही प्रकारचे ॲफिडेव्हिट तयार करण्यासाठी सेतू केंद्रात धाव घ्यावी लागते. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना लागणारी शालेय कागदपत्रे, गृह, वाहन कर्जासाठी करावे लागणारे करारनामे सेतू केंद्रातून होते. ही कागदपत्रे बनविताना बऱ्याचवेळा ‘सिस्टम’ अतिशय संथतीने चालत असल्याचे ओरड सेतू केंद्रचालकांकडून होताना दिसून येते. आता मात्र तांत्रिक दुरुस्तीनंतरही ‘सिस्टम’ योग्य चालेल की नाही, ही येणारी वेळच सांगेल.
-
आपले सरकार सेवा केंद्रांची स्थिती
जिल्ह्यात एकूण................................... ११३३
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत..................... ५५९
ग्रामपंचायतीतीर्गात................................. ५७४
-
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सेवा केंद्र
धुळे शहर................................ ९२
धुळे तालुका........................... १३८
साक्री.................................... १०९
शिंदखेडा................................ ९७
शिरपूर................................... १२३
-
ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत सेवा केंद्र
धुळे तालुका.............................. १४०
साक्री तालुका............................ १७७
शिंदखेडा तालुका........................ १२४
शिरपूर तालुका........................... १२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.