नाशिक

माहेरवाशीनी, चाकरमाने निघाले परतीच्‍या प्रवासाला

CD
मेन फोटो : H35055, H35056, H35057 ----------------- परतीच्या प्रवासासाठी गर्दीचा महापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; जादा बसचे नियोजनही तोकडे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : सणासुदीच्या सुट्ट्या संपवून आपल्या गावी व माहेरी आलेले चाकरमाने आणि माहेरवाशिणी पुन्हा आपल्या कामाच्या व सासरच्या गावी परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. एसटी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते आहे. वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्‍या दिवाळी साजरी करण्यासाठी नाशिकहून अनेक प्रवासी आपल्‍या मूळगावी परतले होते. तर इतर शहरांमध्ये वसलेल्‍या नाशिककरांनी आपली पावले नाशिककडे वळविली होती. यामुळे बसस्‍थानकांवर काही दिवसांपासून नियमित गर्दी बघायला मिळते आहे. काही शाळा, महाविद्यालयांना सोमवार (ता. १६) पासून सुरुवात होत असल्‍याने, तसेच शासकीय व खासगी कार्यालयांत कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांच्या सुट्या संपत असल्‍याने परतीच्‍या प्रवासाचे वेध लागले होते. यामुळे रविवारी सकाळपासूनच बसस्‍थानकांवर गर्दी बघायला मिळाली. शहरातील नवीन सीबीएस, मेळा बसस्‍थानक, महामार्ग बसस्थानक येथे प्रवाशांनी तुडुंब गर्दी केली होती. सकाळपासूनच बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसले. विशेषतः मुंबई, पुणे, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर मार्गावर जाणाऱ्या बसना प्रवाशांची सर्वाधिक पसंती आहे. बस फलाटावर लागताच आत शिरण्यासाठी आणि आसन मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळाली. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीचा सर्वाधिक मनस्‍ताप सहन करावा लागला. बॅगांचे ओझे सांभाळत बस पकडताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने जादा बसेसचे नियोजन केले होते. मात्र, प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने या जादा फेऱ्याही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. -----------चौकट खासगी ट्रॅव्‍हल्सची चांदी या हंगामी काळात खासगी ट्रॅव्‍हल्सच्‍या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक प्रवासी जादाचे पैसे अदा करून तिकीट निश्‍चित करत आहेत. यामुळे ट्रॅव्‍हल्स व्‍यवसायाची चांदी झाली आहे. काही ट्रॅव्‍हल्स व्‍यवस्‍थापनाकडून थेट बसस्‍थानकाच्‍या आवारातून प्रवाशांना गळ घातली जात असल्‍याचेही दृश्‍य बघायला मिळाले. ----चौकट सिडकोतील बाजारपेठा गजबजल्या नवीन नाशिक : भाऊबीज म्हटले की बहिणींचे लाड आणि भाच्यांचे हट्ट पुरवण्याची लगबग सुरू होते. दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणींना आवडीच्या वस्तू घेऊन देण्यासाठी भाऊ सिडकोतील बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्याचबरोबर भाच्यांसाठी खेळणी, कपडे आणि विविध भेटवस्तूंची खरेदीही केली जात आहे. उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक आणि अंबड एमआयडीसी परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांसह लहान मुलांची गर्दी वाढली आहे. मामाच्या गावाला आलेल्या भाच्यांना आवडीच्या वस्तू मिळत असल्याने त्यांचाही आनंद द्विगुणित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT