नाशिक

अतिक्रमण निर्मूलन पथकाचा लॉन्स धारकांकडे मोर्चा

CD
फोटो - 13968 नाशिक : अनधिकृत बांधकाम केलेल्या लॉन्सची पाहणी करताना अधिकारी व कर्मचारी. --- अतिक्रमण निर्मूलन पथकाचा लॉन्स धारकांकडे मोर्चा -- वडाळा, पखाल रोडवर अधिकाऱ्यांकडून सूचना सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २२ : सारडा सर्कल आणि पंचवटी परिसरानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने आता पखाल रोडवरील लॉन्स धारकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. मंगळवार किंवा बुधवारी या भागातील अनधिकृत लॉन्स आणि व्यावसायिक दुकानांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, सोमवारी (ता. २२) महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संबंधित लॉन्स धारकांना प्रत्यक्ष भेट देऊन अनधिकृत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या. -- काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महापालिकेने शहरात पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी सारडा सर्कल येथील पक्क्या हॉटेल्ससह सुमारे ८० लहान-मोठ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली, तर सोमवारी पंचवटी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली. पुढील टप्प्यात पखाल रोड, वडाळा रोड आणि खोडे नगर परिसरातील अनधिकृत बांधकामे टार्गेट केली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, सोमवारी सायंकाळी महापालिका नगररचना व अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी या भागाची पाहणी केली. महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिक आणि लॉन्स धारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमित शेड व बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. .............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

Akola Atrocity Act News: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांत कायद्याचे तंतोतंत पालन करा : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

मोठी बातमी! TMC च्या ६० आमदारांनी ममता बॅनर्जीना अध्यक्षपदावरून हटवलं, अभिषेक बॅनर्जींनाही केलं सस्पेंड, राजकारण तापलं...

SCROLL FOR NEXT