नाशिक

मद्य धुंद ट्रक चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शिवीगाळ

CD
फोटो : A14803 नाशिक : पोलिसांशी वाद करत धिंगाणा करणारा मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित चालक -- मद्यधुंद ट्रकचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १८ : मद्यधुंद ट्रकचालकाकडून वाहतूक पोलिसास धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार द्वारका परिसरात घडला. मुंबई नाका पोलिसांनी संशयित चालकासह कंटेनर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अक्षय कैलास पिंगळे (२८, रा. वडगाव काशीम बेग, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे संशयित चालकाचे नाव आहे. वाहतूक शाखेचे हवालदार अनिल चव्हाण, उपनिरीक्षक अमोल अहिरे आणि पोलिस शिपाई चेतन ठाकरे कर्तव्य बजावत होते. ट्रक (एमएच १४ केए २४९६) द्वारका सर्कल बेदरकारपणे चालवत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी चालकास थांबविले. यामुळे त्याने शिवीगाळ केली. चालकाने चव्हाण यांची कॉलर पकडून त्यांना धक्का दिला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच रिक्षाचालक शब्बीर अमीर शेख यांनी चालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही शिवीगाळ केली. उपनिरीक्षक एस. एस. सोनवणे आणि हवालदार प्रकाश शिंदे यांनी त्याला मुंबई नाका पोलिस ठाण्यात आणले. तेथे चालकाची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली. त्यात पॉझिटिव्ह आढळून आले. चालकाने बराच वेळ घटनास्थळी व ठाण्यात आणल्यानंतरही धिंगाणा सुरूच ठेवला. यापूर्वीही त्याच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. संशयित चालक पूर्वी होमगार्डच्या सेवेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT