बीएलओ गैरहजर;
मतदार नोंदणी खोळंबली
देवळाली कॅम्प, ता. २० : विशेष मतदार नोंदणी शिबिर बीएलओ व निवडणूक अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अनेक मतदार मतदान नोंदणीपासून वंचित आहे. पुढील दोन दिवस होणाऱ्या शिबिरास सर्व बीएलओ यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख काकासाहेब देशमुख यांनी केली आहे
विशेष मतदान नोंदणी शिबिर १९ व २० सप्टेंबरला आयोजित करण्यात आले होते. याबाबत शासनाने जीआरही काढलेला होता. भगूर नगरपालिका जुनी इमारत या ठिकाणी शिबिर आयोजित केले होते परंतु अनेक बीएलओ अनुपस्थित राहिल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. शिबिराच्या ठिकाणी येऊनही बीएलओ न भेटल्यामुळे आपली नावे नोंदवू शकली नाही. त्यामुळे अनेक मतदार मतदान नोंदणीपासून वंचित राहतील, अशी भीती आहे. २६ व २७ सप्टेंबर दोन दिवस होणाऱ्या शिबिरास सर्व बीएलओ यांनी उपस्थित रहावे अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा देशमुख, नगरसेवक अमोल सागरचंद्र मोरे, बबलू पवार, नगरसेविका कांता गायकवाड, जयश्री देशमुख, अनिल कासार, निलेश हासे, संतोष सोनवणे, सुधाकर ताजनपुरे, अशोक कनोजिया,श्याम देशमुख, नावेद शेख, अमोल गणोरे, भूषण करंजकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.