नाशिक

छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारा अनोखा उपक्रम संभाजी फाऊंडेशनतर्फे प्रशासकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना पुस्तक भेट

CD
06864 (क्रॉप करणे) सटाणा : पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना ‘शंभूगौरव’ पुस्तक भेट देताना फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव सोनवणे. वाचन संस्कृतीसाठी संभाजी फाउंडेशनचा पुढाकार सटाणा : ता.१५ : धर्मरक्षण, राष्ट्रनिष्ठा आणि अद्वितीय शौर्याची प्रेरणा देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सटाण्यात संभाजी फाउंडेशनच्या वतीने पुस्तक भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञान, विचार आणि इतिहास जपण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून विविध क्षेत्रातील लोकसेवकांना पुस्तके भेट देत वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ पराक्रमापुरते मर्यादित नसून विद्वत्ता, अभ्यासू वृत्ती आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, युवकांमध्ये इतिहासाविषयी अभिमान निर्माण व्हावा आणि समाजात वाचन संस्कृती अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अध्यक्ष वैभव सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार सचिन मारके पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील, पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक राहुल पाटील, निवृत्त मुख्याध्यापक विनायक बच्छाव तसेच रोटरीचे माजी प्रांतपाल प्रदीप बच्छाव यांना पुस्तके भेट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT