नाशिक

सटाणा न्यायालयातील लोकन्यायालयात १ कोटी ८१ लाखांची वसुली १,२४३ प्रकरणे तडजोडीने निकाली; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांतून मोठी रक्कम वसूल

CD
पान दोन सेकंड मेन -------------- 07274 सटाणा : येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, न्यायाधीश आर.बी. कुलकर्णी, ॲड. सतीश चिंधडे, ॲड.ए.एल. पाटील, ॲड.पी. पी. भामरे आदी. लोक अदालतीत १२४३ प्रकरणे तडजोडीने निकाली १ कोटी ८१ लाखांची वसुली; सामोपचाराने प्रकरणे मिटविण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १७ : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाला चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा तालुका विधी सेवा समिती आणि सटाणा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या लोकन्यायालयात एकूण ६०४७ प्रकरणांपैकी १२४३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, त्यातून तब्बल १ कोटी ८१ लाख ८८ हजार रुपयांची वसुली झाली. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांच्या अध्यक्षतेखाली लोकन्यायालयाचे उद्‌घाटन झाले. यावेळी पॅनल न्यायाधीश आर.बी. कुलकर्णी यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व, तडजोडीने वाद निकाली काढण्याचे फायदे आणि नागरिकांना मिळणाऱ्या कायदेशीर सुविधांबाबत मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी उपस्थितांना आवाहन त्यांनी केले. लोकन्यायालयात ८०९ प्रलंबित आणि ५ हजार २३८ दाखलपूर्व असे ठेवण्यात आलेल्या एकूण ६ हजार ०४७ प्रकरणांपैकी प्रलंबित प्रकरणांतील १०१ प्रकरणे निकाली निघून त्यातून ८५ लाख ५० हजार रुपये, तर दाखलपूर्व प्रकरणांतील ११४२ प्रकरणांतून ९६ लाख ३८ हजार रुपये वसूल झाले. लोकन्यायालयाच्या कामकाजासाठी पॅनल ॲड.दीपक बोरसे व ॲड. यशश्री चंद्रात्रे यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे सदस्य ॲड. सतीश चिंधडे, ॲड.ए.एल. पाटील, ॲड.पी. पी. भामरे, ॲड.प्रवीण बागुल, ॲड.एस. आर. सोनवणे, ॲड.सुनील अहिरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, साहाय्यक गटविकास अधिकारी भय्यासाहेब सावंत, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, साहाय्यक अधीक्षक सचिन खैरनार, विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी वीरेंद्र सोनवणे तसेच न्यायालयीन कर्मचारी प्रशांत आहेर, श्रीकृष्ण पाटील, प्रतीक काळे, तुषार जगताप, आकाश सोनवणे, साहेबराव पवार, योगेश विधाते, पल्लवी अमृतकर, तेजस बच्छाव, वैशाली वाघ, योगेश बिरारी, गोरख पवार व ज्योती हिरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT