नाशिक

अखेर १० दिवसांची मृत्यूशी झुंज संपली; कै. पूनमने घेतला अखेर श्वास

CD
00482 पुनम निरभवणे पूनमची मृत्यूशी झुंज अपयशी दहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू सकाळ वृत्तसेवा ठेंगोडा, ता. १८ : दहा दिवसापूर्वी अपघातात जखमी झालेल्या पुनम निरभवणे (वय २२) हिचा दहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुनमच्या मृत्यूमुळे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. पूनम हिने बारावीचे शिक्षण पूर्ण करून नर्सिंगचा कोर्स केला होता. ती मालेगाव येथे नर्सिंगच्या मुलाखतीसाठी जाणार होती. मात्र, बस थांब्यास बस थांबत नसल्याने पूनमचा भाऊ अनुराग हा तिला लोहोणेर येथे सोडविण्यासाठी दुचाकीवरून निघाला असताना गावातील हनुमान मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धुळे-साक्री बस (एमएच २० बीएल ३१२६) जोराची धडकली. यात पुनम जखमी झाली असता तिस नाशिक येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने एस. टी.महामंडळ व सुरू असलेल्या हायवे काम करणारे कंपनी विषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, गावालगतच्या महामार्गावर वारंवार अपघात होत असून,गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग आणि योग्य ठिकाणी बस थांबा फलक यासारख्या आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ सतत पाठपुरावा करत असून या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पूनमच्या मृत्यूने या गरीब कुटुंबाला बस महामंडळाकडून मदत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT