YEO26B25287
दिल्ली : कॅप्सूल कार्यक्रमात निवडीबद्दल डॉ.पवन आव्हाड यांना प्रमाणपत्र देताना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे पदाधिकारी.
------------------------
३०२-
दिल्ली फार्मसी कॅप्सूलसाठी
डॉ. आव्हाड यांची निवड
---------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१४ : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने बी.फार्मा शिक्षणात मोठा बदल करत नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत कॅप्सूल- नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी येथील मातोश्री फार्मसी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. पवन आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रीय औषध नियंत्रक डॉ. अजय सचान म्हणाले,‘ नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कामाचे योग्य ज्ञान देईल. त्यामुळे ते पुढे जॉब आणि रिसर्चसाठी अधिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल. फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. मोंटूकुमार पटेल, उपाध्यक्ष जस्सू चौधरी, डॉ. दीपेंद्रसिंह, डॉ. शिवानंद, डॉ. कपिल कलरा यांच्यासह अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. नव्या बदलामुळे भारतातील फार्मसी शिक्षण अधिक मजबूत होईल आणि या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होईल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे कॅप्सूल कार्यक्रमासाठी देशभरातील निवडक १०० प्राध्यापक उपस्थित होते. महाराष्ट्रातून डॉ. पवन आव्हाड यांना डॉ. पटेल आणि श्री. चौधरी यांच्या माध्यमातून ही संधी मिळाली. या यशाबद्दल जगदंबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, मातोश्री संस्थेचे अध्यक्ष आमदार किशोर दराडे, कार्यकारी संचालक रूपेश दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, समन्वयक सुनील पवार आदींनी डॉ. आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.