Traffic esakal
नाशिक

वाहतूक कोंडीने कोंडला श्‍वास; मनमाडकरांना रोजच मन:स्ताप

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : चांदवड- नांदगाव मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने पुणे- इंदूर राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा (Traffic) सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मनमाड शहराचा श्‍वास कोंडला जात असून, रोजच होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

चांदवड- नांदगाव मार्गाच्या दुपदरीकरणाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नांदगाव मार्गाचे काम सुरू झाले नसले तरी चांदवड मार्गाचे काम मालेगाव चौफुलीपर्यंत आले आहे. सदर काम दुपदरी असले तरी एक पदरी काम होत असून, एक बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी दुपदरी काम झाले आहे, या कामामुळे चांदवड, नांदगाव आणि पुणे- इंदूर राष्ट्रीय महामार्गावर रोजच मोठी वाहतूक कोंडी होत असते. पुणे- इंदूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. सतत वर्दळीचा मार्ग असल्याने या कोंडीमुळे वाहनधारकांना डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी होते. अनेकदा गंभीर आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकल्या जात असल्याने रुग्णाच्या जीवावर देखील बेतत आहे. त्यातच या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची गर्दी होते. तर नांदगाव मार्गाने इंधन कंपन्यांचे इंधन टँकर येत- जात असल्याने मोठी गर्दी असते. इंदूर- पुणे महामार्गावरून जड, अवजड वाहनांची वाहतूक होते. अशा वाहतुकीमध्येच घुसणाऱ्या वाहनांमुळे कोंडी निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Sindhudurg-Ratnagiri Rain : पुढील 4 दिवस धोक्याचे! मुंबई वेधशाळेचा 'या' भागांना मोठा इशारा; वारे ताशी 40 किमी वेगाने वाहणार, आज आणि उद्या यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT