फोटो 16237
मालेगाव कॅम्प : टेहेरे येथील महामार्गावर सणासुदीत राजधानी हॉटेल ते मनमाड चौफुलीपर्यंत झालेली वाहतूक कोंडी.
------
महामार्गावर टेहेरे नजीक वाहतूक कोंडी
--------------------------------
नियोजनाचा अभाव; ग्रामस्थांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता.१५ : टेहरे येथील महामार्गावर उड्डाणपुलाचे व रस्ते विकासाचे काम सुरू आहे. दिवाळी सण संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
राजधानी हॉटेल ते थेट मनमाड चौफुलीपर्यंत महामार्गावर रविवारी (ता.१५) दुपारी चारला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या व रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटनाला नागरिकांचा वाढत प्रतिसाद व सुट्टी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग प्राधिकरण अधिकारी व महामार्ग पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी सुरक्षा प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपाचा तिढा सोडवण्यासाठी सुरक्षा रक्षक कुठेही धजावताना दिसून येत नाही.
उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना मात्र टेहेरे बोगद्याजवळील रस्ता अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांना वाहतुकीचा अडथळ्याने वेळ खर्ची पडत आहे. रस्त्यावरील वाहनचालकांना दिवाळीच्या सणासुदीत आठ ते दहा दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातून वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास वाहतूक पोलिस प्रशासन व महामार्गावरील कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करून वाहनांची कोंडीतून सुटका करण्याची मागणी टेहरे ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.