Beautified Square  esakal
नाशिक

सुशोभीकरणामुळे चौकांचे पालटतेय रूप; 132 चौकांना मिळणार नवा लूक

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेकडून (NMC) शहरातील १३२ चौकांचे सुशोभीकरण (Square Beautification) होणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे अनेक चौकांचे रूपडे पालटू लागले आहे. (traffic squares beautification 132 squares will get new look Nashik News)

beautified Square

महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) सर्व चौकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएस, शालिमार येथील इंदिरा गांधी चौक, रविवार कारंजा आदी प्रमुख चौकांचे सुशोभीकरण सुरू झाले असून, ते आकर्षण ठरत आहे. शहरातील जुन्या चौकांचे करार नव्याने तपासून अटी-शर्तीनुसार शहरातील विविध चौकांचे सुशोभीकरण सध्या सुरू आहे.

beautified Square

नाशिक धार्मिकनगरी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. वर्षभर जगभरातील भाविकांची नाशिकला वर्दळ असते. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वरलाही मोठ्या संख्येने भाविक जातात. नाशिकच्या सौंदर्यकरणावर महापालिका आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार १३२ चौकांची यादी तयार केली आहे. चौकांचे सुशोभीकरण करताना त्यात एकसारखेपणा असावा. प्रत्यक्षात तो तसा दिसावा, असे आयुक्तांचे प्रयत्न आहेत. शहरातील सीबीएस, शालिमार येथील इंदिरा गांधी चौक, रविवार कारंजा, अशोक स्तंभ यांच्यासह इतर लहान-मोठ्या चौकांचा समावेश आहे. चौकांचे सुशोभीकरण झाल्यानंतर नाशिकचा वेगळा ठसा जगभरात निर्माण होणार आहे, तसेच येणाऱ्या भाविकांनाही नाशिकनगरी सुंदर वाटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT