train travel corona rule Nashik Godavari closed Panchavati sakal
नाशिक

नाशिक गोदावरी बंद अन् पंचवटीचे डबेही घटले; प्रवासात कोरोना नियमांचा फज्जा

रेल्वे प्रवासात कोरोना नियमांचा फज्जा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसने रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सध्या मोठीच गैरसोय सुरू आहे. कोरोना पूर्वी मासिक पास धारकांसाठी चार आरक्षित डबे कमी झाल्याने एकाच डब्यात पासधारकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. दीड वर्षापासून कोरोना आगमनानंतर वाहतूक वेळापत्रक कोलमडले आहेत. विशेषतः रोज मुंबईला अप-डाउन करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय वाढली आहे.

कोविड पूर्वी नाशिकहून मुंबईला ये- जा करणाऱ्या मासिक पासधारकांसाठी ५ डबे आरक्षित होते. त्यापैकी एक डबा पासधारकांसाठी आरक्षित होता व ४ डबे सामान्य प्रवाशांसाठी होते. परंतु, आता नाशिकसाठी एकही डबा आरक्षित नाही. पूर्वीप्रमाणे नाशिकला उघडणारा मासिक पास डबा व इतर ४ सामन्य डबे नाशिकसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. पंचवटी मासिक पासधारकांचे डबे घटल्याने एकाच डब्यात प्रचंड गर्दी होते. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी रेल्वेगाड्या घटविल्या आहेत, तर दुसरीकडे मात्र प्रचंड गर्दीत नाशिकच्या प्रवाशांना मुंबईला जावे लागते.

प्रवाशांना दुहेरी मार

पंचवटीत प्रवाशांसाठी एका बाजूला डबे कमी केले असताना गोदावरी रेल्वेही बंद आहे. त्यामुळे पंचवटी आणि गोदावरी अशा दोन गाड्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांचा सगळा ताण एकट्या पंचवटी एक्स्प्रेसवर पडला आहे. त्यात पंचवटीचे डबे कमी केले पण गोदावरी एक्स्प्रेसही बंद असल्याने दुहेरी मार प्रवाशांना सोसावा लागतो आहे. कोरोना कमी झाल्याने दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत असताना सध्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने पंचवटी एक्स्प्रेसवर संपूर्ण ताण वाढला आहे. जे सध्या सहा डबे अनारक्षित केले आहे ते मनमाड येथूनच प्रवाशांनी भरलेले असतात. त्यामुळे नाशिक येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व पासधारकांना बसण्यास जागा मिळत नाही. यासाठी मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनमार्फत रेल्वे प्रशासनास मागणी करण्यात येणार आहे.

''पंचवटीचे डबे कमी केले पण गोदावरी एक्स्प्रेसही बंद असल्याने दुहेरी मार प्रवाशांना सोसावा लागतो आहे. कोरोना कमी झाल्याने दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत असताना सध्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने पंचवटी एक्स्प्रेसवर संपूर्ण ताण वाढला आहे.''

- किरण बोरसे, रेल्वे वेल्फेअर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT