ragging death doctor esakal
नाशिक

नाशिक : शिकाऊ डॉक्टर रॅगिंगचा बळी? सुसाइड नोटमध्ये खुलासा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा ( doctor) संशयास्पद मृत्यु (death) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असे या डॉक्टरचे नाव असून तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये (suicide) त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

मुलींच्या रॅगिंगचा बळी?

सुत्रांच्या माहितीनुसार कॉलेजमधील काही मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या. त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीसांकडून याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. रॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे

आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

स्वप्नील महारु शिंदे (वय २६ रा. मेडीकल कॉलेज) मंगळवार (ता.१७) रोजी सुमारे ७ .३० वाजता मेडिकल कॉलेज येथील ऑपरेशन थिएटरच्या बाजूस असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यावर उपचार सुरू होते.स्वप्नील यास रात्री सुमारे १०.३० चे सुमारास डॉ. जितेंद्र खोडीलकर यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT