Tree-Plantation esakal
नाशिक

नाशिक : पावसाळा संपताना वृक्ष लागवडीची उद्यान विभागाला जाग

विक्रांत मते

नाशिक : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरात दरवर्षी वृक्ष रोपांची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. परंतु, महापालिकेच्या उद्यान विभागाला परतीच्या पावसात साडेअकरा हजार रोपांची लागवड करण्याचे सुचले आहे. सहा विभागात वृक्षलागवडीसह दोन वर्षे संगोपनासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

दीड कोटी रूपयांचा खर्च

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जाते. त्यासाठी अंदाजपत्रकात ठराविक निधीची तरतूद केली जाते. जून महिन्यात पावसाला सुरवात होत असल्याने पाच जूनला वाजतगाजत मोहिमेचे उद्‌घाटन होते. पुढे महिना भर ठेकेदारांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. पावसाळ्याच्या चार महिन्यात रोपांना पालवी फुटून वर्षभरात डेरेदार स्वरूपात वृक्ष तयार होतात. जून महिन्यातच वृक्ष लागवड केली जाते. त्यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली जाते. विभागनिहाय वृक्षारोपणाचे ठेके देवून दोन वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी दिली जातात. यावर्षी मात्र उद्यान विभागाला उशिराने जाग आली असून, आता निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. विभागनिहाय साडेअकरा हजार वृक्षांची रोपे लावली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दोन कोटी रुपयांची तरतूद असली तरी यंदा लागवडीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. साडे अकरा हजार वृक्ष लागवडीबरोबरच दोन वर्षे देखभालीसाठी ठेकेदारांवर जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी दिली.


अशी होणार विभागनिहाय वृक्ष लागवड

विभाग वृक्ष लागवडीची संख्या अपेक्षित खर्च
पंचवटी ३००० ३८,४७,२००
सातपूर ३००० ३८,४६,०८०
नाशिक रोड २५०० ३३,०७,१२०
पूर्व १००० १२,८२,४००
पश्चिम १००० १२,८२,४००
सिडको १००० १२,८२,४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: उत्तर मुंबईत मनसे आणि भाजपाला मोठा धक्का

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

PMC QR Code Hoardings: पुण्यात आता होर्डिंगसाठी क्युआर कोड बंधनकारक! महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT