नाशिक

मानवधन संस्थेतर्फे पाड्यावर साजरी झाली १८ वी दिवाळी

CD
फोटो : B13075 धारवाडी (ता. इगतपुरी) : दिवाळीसाठी जमलेल्या आदिवासी बांधवांसह डॉ. प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सरपंच पांडुरंग पुंजारा, लक्ष्मण पादिर आदी -- आदिवासी वाड्यांवर ज्ञानाचा, आपुलकीचा प्रकाश मानवधन संस्थेचा अनोखा दिवाळी सोहळा इंदिरानगर, ता. १५ : शाश्वत आनंदाचा साक्षात्कार या संकल्पनेतून मानवधन संस्थेतर्फे सलग १८ व्या वर्षी इगतपुरी तालुक्यातील धारवाडी व परिसरातील आदिवासी वाड्यांवर आदिवासी बांधवांसोबत यंदाचा दिवाळी सण साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक ज्ञानरत्न डॉ. प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही सामाजिक संस्कारांची अखंड परंपरा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी पाड्यांवरील परिसराची स्वच्छता, घरांसमोर सुंदर रांगोळ्या, मुलांनी शाळेत तयार केलेले आकाशकंदील आणि दीपप्रज्वलन अशा विविध उपक्रमांतून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला होता. जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, दिवाळी फराळ, कोरडा शिधा, लहान मुलांना कपडे, महिलांना साडी, पुरुषांना कपडे आणि अन्नदान अशा स्वरूपात मदतीचा हात देण्यात आला. वैतरणा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमोल ढेरिंगे, सरपंच पांडुरंग पुंजारा, आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण पादिर, माजी सरपंच निवृत्ती पादिर, सतु पादिर, शांताराम पादिर, लक्ष्मण आहेर यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक वैशाली पवार, सुरेखा आवारे, ज्योती प्रधान, पूनम पाटील आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Photography: डॉक्टरची निसर्गाशी अनोखी मैत्री! ऋषी गाडगे यांच्या छायाचित्रांतून उलगडले पक्ष्यांचे विश्व

दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षकाने उचललं मोठं पाऊल; 'सिनेमॅन'ची हटके कथा पोहोचली थेट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

तरुणीला भररस्त्यात अडवलं, शरीरावर सपासप वार केले अन्..., एकतर्फी प्रेमातून तरुणाचं क्रूर कृत्य; अंबरनाथमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : विहिरीच्या मोजणीसाठी उतरले अन् काळाने घात केला; मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, आंबे गावावर शोककळा

Rajuri leopard cub : राजुरीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा आठ दिवसांचा बछडा आढळला; शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती

SCROLL FOR NEXT