नाशिक

जनजातीय गौरव दिनानिमित्त स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता

CD
NSK26H35027 नंदुरबार : महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करताना. --- आदिवासी गाव-पाड्यांत संस्कृतीचे दर्शन जनजातीय गौरव दिनानिमित्त आदी कर्मयोगी स्वयंसेवकांचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरवदिनी आदी कर्मयोगी अभियानांतर्गत जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रमांतर्गत आदी कर्मयोगी स्वयंसेवकांच्या पुढाकारातून नंदुरबार प्रकल्पांतर्गत नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तीन तालुक्यांतील एकूण ३५३ आदिवासी गाव-पाड्यांमध्ये विशेष स्वच्छता व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी गावातील आदिवासी महापुरुषांची स्मारके, पुतळे, देवी-देवता, समाजमंदिरे, तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत आदी कर्मयोगी स्वयंसेवकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख व्हावी, या उद्देशाने आदिवासी देव-देवतांच्या पूजापद्धती, पारंपरिक श्रद्धा, रुढी-परंपरा, सामाजिक अस्मिता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रमही आदी कर्मयोगी स्वयंसेवकांमार्फत आयोजित करण्यात आले. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला स्वाभिमान, संघर्ष आणि सांस्कृतिक अस्मितेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, आदिवासी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करणे, ऐतिहासिक वारशाचे जतन करणे, तसेच गावपातळीवर स्वच्छता आणि सामाजिक सहभागाची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आदी कर्मयोगी स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावपातळीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होण्यास, तसेच पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी सामूहिक सहभागाला प्रोत्साहन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Photography: डॉक्टरची निसर्गाशी अनोखी मैत्री! ऋषी गाडगे यांच्या छायाचित्रांतून उलगडले पक्ष्यांचे विश्व

दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षकाने उचललं मोठं पाऊल; 'सिनेमॅन'ची हटके कथा पोहोचली थेट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

तरुणीला भररस्त्यात अडवलं, शरीरावर सपासप वार केले अन्..., एकतर्फी प्रेमातून तरुणाचं क्रूर कृत्य; अंबरनाथमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : विहिरीच्या मोजणीसाठी उतरले अन् काळाने घात केला; मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, आंबे गावावर शोककळा

Rajuri leopard cub : राजुरीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा आठ दिवसांचा बछडा आढळला; शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती

SCROLL FOR NEXT