नाशिक

गौरव दिन सेवा सप्ताह

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... --- फोटो क्रमांक : 35052 शेवगे (ता. साक्री) : शासकीय आश्रमशाळेत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत कार्यक्रमात लाभार्थ्यास धनादेश देताना आमदार मंजुळा गावित. शेजारी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील आदी. --- शेवगे आश्रमशाळेत लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह; स्वावलंबनाचे नवे पाऊल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : शासकीय योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचवून आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शेवगे (ता. साक्री) येथील शासकीय आश्रमशाळेत लाभ वितरण मेळावा पार पडला. आमदार मंजुळा गावित यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश व अर्थसहाय्य वितरण करण्यात आले. यानिमित्ताने आदिवासी बांधवांसाठी स्वावलंबनाचे नवे पाऊल उचलण्यात आले. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ साजरा होत आहे. या सप्ताहानिमित्त धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या वतीने या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गावित, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, पिंपळनेर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशांचे वितरण करण्यात आले. तसेच वनहक्क समित्यांना आराखडा तयार करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. योजनांच्या लाभासोबतच उपस्थितांना विविध कल्याणकारी योजना, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माहिती आणि प्रत्यक्ष लाभाची सांगड घालणारा हा उपक्रम ठरला. प्रकल्प अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akwan: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती; ‘अक्वान’मुळे मुसळधार पावसाचा इशारा

IND vs NZ 5th ODI: अर्शदीप-सिराजचा धुमाकूळ! भारताचा न्यूझीलंडवर रोमांचक विजय, ७ वर्षांनंतर मायदेशात किवींचा मालिका पराभव

Pune Nashik Highway: चंदनापुरी घाटात आठ वाहनांचा अपघात ;महामार्गावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

MPSC Success Story: अंबवडे ते IIT मद्रास अन् MPSC मध्ये यश; परवेज मुलाणी यांची सहाय्यक नगर रचनाकारपदी निवड, जिद्द अन् चिकाटीच्या जाेरावर यशाला गवसणी

Latest Marathi News Live Update : "छठपूजेचा अतिरेक नको, हा महाराष्ट्र आहे"; संजय राऊतांच्या इशाऱ्यावर भाजपचे नेते नवनाथ बन यांचा पलटवार

SCROLL FOR NEXT