Trimbakeshwar Sakal News
नाशिक

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; लाखो भाविकांचा हिरमोड

कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथे ऐन श्रावण महिन्यात मंदिर बंद असल्याने लाखो भाविकांचे हिरमोड झाला आहे. प्रतिवर्षी परराज्यातील भाविक श्रावण पर्वकाळ म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar) दर्शन व अभिषेक पूजा व इतरही धार्मिक पूजा करण्यासाठी हजेरी लावतात. त्यामुळे येथील मंदिर व्यवस्थापनासह सर्व व्यावसायिकांना रोजगार मिळतो. परंतु, कोरोनामुळे येथील सर्व व्यवहार बंद असल्याने मोठा अर्थ व्यवहारात फटका बसला. त्याचीच पुनरावृत्ती याही वर्षी झाली आहे.

‌पहिल्या श्रावण सोमवारी जमावबंदी आदेश लागू केल्याने व मंदिर चौक ते लक्ष्मी नारायण चौकात बांबू लावून हा भाग बंद केल्याने व्यावसायिकांना व तेथील रहिवासी लोकांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर व्यावसायिक लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब दर्शविल्यामुळे त्यात थोडा बदल करीत स्थानिक लोकांना व्यवस्था करण्यात आली. मंदिर परिसरात मात्र मोठे अडथळे उभारले होते. ‌दुपारी तीन वाजता श्रींची पालखी काढण्यात आली. बाहेरून आलेल्या भाविकांची गर्दी झाली होती. पालखी कुशावर्त तीर्थावर स्नान पूजा झाल्यावर मंदिरात परतली.

‌पालखी मार्गात नेहमीप्रमाणे वाहने स्थानिकांना बाहेरील भाविकांची बिनदिक्कत उभी केलेली होती. त्यामुळे पालखी समवेत चालणाऱ्या सगळ्यांना त्रास सहन करावा लागला. या बाबतीत दर सोमवारी पालखी मार्गावर उभ्या वाहने करणाऱ्यावर कारवाई होईल का, अशी विचारणा भाविक करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT