फोटो- 27531
देशमाने : गोई नदीच्या पुलाचा लोखंडी कठडा तोडून नदीत कोसळलेला ट्रक.
विटांनी भरलेला ट्रक गोई नदीत कोसळला
अपघातात ट्रकचा चक्काचूर
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १५ : विंचूर-येवला मार्गावर टायर फुटल्याने नियंत्रण सुटलेला विटांनी भरलेला भरधाव ट्रक पुलाचे लोखंडी कठडे तोडून थेट देशमाने येथे गोई नदीत कोसळल्याची घटना शनिवारी (ता. १४) रात्री नऊच्या सुमारास घडली. अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून, चालक जरदाद शाबीर खान (रा. कमालपुरा, ता. मालेगाव) गंभीर जखमी झाला.
देशमाने ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे पावणेदोन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. नाशिक-संभाजीनगर मार्गावर विटांनी भरलेला ट्रक (एमएच ०६ के ८२२२) मालेगावकडे जात असताना देशमाने गावाजवळील गोई नदीच्या पुलावर पोहोचताच अचानक ट्रकचा टायर फुटला. ट्रकचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच ट्रक पुलाचे लोखंडी कठडे तोडून नदीत कोसळला. मात्र ट्रकच्या मागून येणाऱ्या वाहनचालकांनीही वाहनाचा वेग भरधाव असल्याचे सांगितले.
ट्रक नदीत कोसळल्याचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनीही तातडीने मदतकार्य सुरू केले. ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेल्याने चालक आत अडकला होता. त्याला बाहेर काढणे कठीण होते. ग्रामस्थांनी जेसीबी आणि क्रेनने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला येवला येथे हलविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.