Real Estate
Real Estate esakal
नाशिक

Diwali Real Estate : रिअल इस्टेटमध्ये दिन... दिन... दिवाळी!

विक्रांत मते

नाशिक : अनेक वर्षांपासून मंदीच्या गर्तेत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात दिवाळीच्या मुहूर्तांवर करोडो रुपयांची उलाढाल झाली. पाडव्याच्या दिवशी जवळपास सव्वाशेहून अधिक नवीन प्रकल्पांचा नारळ फुटणार आहे. (Turnover of crores of rupees in real estate launch of new projects at diwali festival Padwa Nashik News)

२०१४ ते २०१७ हा कालावधी नाशिकच्या रिअल इस्टेट व्यवसायासाठी नुकसानकारक ठरला. २०१७ मध्ये नवीन विकास आराखडा जाहीर झाला. मात्र, त्यातील त्रुटींमुळे व्यवसायावर नकारात्मक परिणाम दिसून येण्याची वेळ आली. यातील पार्किंगचे क्लीष्ट नियमानमुळे व्यवसाय करावा की नाही, अशी स्थिती निर्माण झाली. याचदरम्यान महारेरा अंतर्गत प्रकल्प नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले.

एका मागून एक समस्यांचा सामना करत असताना, २०१९ मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली व त्यात मोठ्या प्रमाणात एफएसआय देण्यात आल्याने बांधकाम व्यवसायिकांसाठी पर्वणी ठरली. मात्र, बाजारात निर्माण झालेल्या उत्साहाला कोरोनामुळे मोठा ब्रेक बसला. कोरोनाची दोन वर्षे जात नाही, तोच बांधकाम साहित्याच्या दराने दरवाढीचे मागचे सर्व विक्रम मोडीत काढले.

मात्र, नाशिकमध्ये घराची निकड लक्षात घेऊन ग्राहकांचा प्रतिसाद कायम राहिला. डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत प्रीमियम शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची नोंदणी झाली. त्या प्रमाणात शहर व परिसरात जानेवारी महिन्यापासून मोठ्या प्रमाणात नवीन प्रकल्प सुरू झाले. अक्षयतृतीया व गुढीपाडव्यानंतर दिवाळी व दिवाळी पाडव्याचा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहक आता सरसावला आहे.

गणेशोत्सव व विजयादशमीला असलेला ग्राहकांचा उत्साह आजही बाजारात कायम दिसून आला. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन बुकिंगसह नवीन घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रवेश झाले. गृहप्रवेशाची संख्या दोन हजारांच्या आसपास आहे, तर मोठी बुकिंग झाल्याने उलाढाल करोडो रुपयांच्या घरात पोहोचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT